महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणारी अनेक पुरातन मंदिरे आहेत. काही ऐतिहासिक वास्तूंची पडझड झालेली दिसते.
2/ 6
बीड जिल्ह्यातही शिल्पकलेचा उत्तम नमुना असणाऱ्या काही वास्तू आहेत. अंबाजोगाईच्या शहरात बालघाटाच्या डोंगर रांगेत सकलेश्वर बारा खांबी मंदिर आहे. हे मंदिर चालुक्य राजाच्या काळातील आहे.
3/ 6
या मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली आणि मूर्ती व शिळा याच परिसरात अस्ताव्यस्त झाल्या. अनेकांनी मागणी केल्यानंतर 2017 मध्ये पुरातत्व विभागाने या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यासाठी उत्खनन सुरू केले.
4/ 6
सखलेश्वर मंदिर परिसरात 7 ते 8 महिने काम सुरू होते. या ठिकाणी 115 मूर्ती विखरून पडलेल्या आढळल्या.
5/ 6
सखलेश्वर मंदिर परिसरात आढळलेल्या 115 मुर्ती एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आल्या. मात्र हे शेड चारही बाजूंनी खुले आहे. त्यामुळे या मूर्ती असुरक्षित आहेत.
6/ 6
आता पुरातन मूर्ती धाराशिव जिल्ह्यातील तेरच्या वस्तुसंग्रहालयात नेण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी या मूर्तींचे संवर्धन व जतन केले जाणार आहे, असे पर्यटन विभागाचे सहसंचालक अमोल गोटे यांनी सांगतिले.