महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी बस प्रवाशांची सेवा करत आहेत.
2/ 10
आता एसटी नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रवाशांना लक्झरी सेवा नवीन बसमध्ये मिळणार आहेत.
3/ 10
राज्यभरातील विविध आगारांत नव्या रुपातील लाल परी दाखल होत आहेत. त्यामुळे आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे.
4/ 10
बीड जिल्ह्यात राज्य परिवहन विभागाचे 8 आगार आहेत. या आगारांसाठी बीएस 6 या नवीन रुपातील 10 बस जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
5/ 10
आकर्षक लुक असणाऱ्या या बसमध्ये विविध सुविधाही देण्यात आल्या आहेत. बसण्यासाठी पुश बॅक सीट देण्यात आले असून आरामदायी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
6/ 10
आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी बसमध्ये तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. चालक, वाहक आणि मुख्य प्रवासी दरवाजाच्या बाजूने ही व्यवस्था आहे.
7/ 10
पूर्वी प्रवाशांना बसमध्ये मोबाईल चार्जिंगची समस्या जाणवत होती. मात्र या बसमध्ये प्रवाशांसाठी चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.
8/ 10
लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून अनेकजण खासगी बसलाही प्राधान्य देत होते. परंतु, खासगी बसच्या दर्जाच्या सुविधा एसटी बसमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
9/ 10
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.
10/ 10
राज्य परिवहन मंडळाचा प्रवाशांना आरामदायी प्रवास सुविधा देण्याचा हेतू नेहमीच असतो. यातच आता बीएस 6 च्या आधुनिक 10 बस बीड विभागाला मिळाले आहेत. जिल्ह्यातील आगारांना मागणीनुसार आणखीन बस लवकरच मिळतील, असे विभागीय नियंत्रण अजयकुमार मोरे यांनी सांगितले.