PHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली पाहायलाच हवीत अशी 10 व्यंगचित्रं
काश्मीरपासून चीन धोरणापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनेक विषयांवर भाष्य केलं आणि नेहरूंपासून महागाईपर्यंत सगळ्यांवर फटकारे मारले. त्यांनी काढलेली पाहावीच अशी ही 10 चित्रं... बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने...


फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर मार्मिकमध्ये नियमितपणे चित्रं काढणं सुरू ठेवलं होतं.


१६ एप्रिल १९५५मध्ये प्रसिद्ध झालेलं हे व्यंगचित्र. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष कसे अचानक कामाला लागतात याची झलक दाखवणारं.


करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली, असं म्हणणाऱ्या सरकारवर ताशेरं ओढणारं हे आणखी एक व्यंगचित्र.


मुंबई कॉर्पोरेशनमधलं विरोधाचं राजकारण टिपणारं हे बोलकं व्यंगचित्र बाळासाहेबांनी चितारलं होतं १७ सप्टेंबर १९५४ मध्ये.


नेहरूंच्या चीन धोरणावर टीका करणारं आणखी एक व्यंगचित्र. हे चित्र 11 सप्टेंबर 1959 रोजी प्रसिद्ध झालं होतं.


२९ नोव्हेंबर १९४८ रोजी प्रकाशित झालेलं हे बाळासाहेबांनी काढलेलं व्यंगचित्र महागाईवर आसूड ओढणारं आहे.


१९४९मध्ये काढलेल्या या कार्टूनमधून काश्मीर समस्येसंबंधात झालेल्या सामंजस्य कराराबद्दल भाष्य केलंय.