Aurangabad Rains : अचानक आलेल्या पावसाने औरंगाबादकरांची उडाली तारांबळ, पहा काही PHOTOS
औरंगाबाद शहरात अचानक पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. शहराच्या विविध ठिकाणी नागरिकांनी पावसापासून आपला तात्पुरता बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट, पाॅलिथीन बॅग्ज, ताडपत्रीचा आधार घेतला.
|
1/ 9
भाजी मंडई परिसरात व्यक्ती पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पोत्याचा खोपा करून, अंगावर पांघरूण घेऊन जात असताना एक व्यक्ती.
2/ 9
छत्रीचा आधार घेत सरस्वती भुवन कॉलेजसमोरून दुचाकीवर ट्रिपल सीट जाणारे महाविद्यालयीन तरुण पावसापासून स्वतःला वाचवत वाहतुकीचे नियम चुकवत जात आहेत.
3/ 9
गुलमंडी येथील बाजारपेठेत खरेदी करून पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोटचा आधार घेत घराकडे परतत असणारी महिला.
4/ 9
औरंगपुरा येथील शिशुविहार शाळेसमोर फेरीवाल्यांनी ताडपत्रीने हातगाडीवरील साहित्य झाकून घेतले. स्वतः डोक्यावर पॉलिथिन बॅग लावून जात असताना...
5/ 9
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले चौकाकडून मिल कॉर्नरच्या दिशेने दुचाकीवर जाणारी आई आणि मुलगी... दुचाकी चालवणाऱ्या मुलीला पाऊस लागू नये म्हणून छत्री घेऊन बसलेली आई.
6/ 9
ऊन, वारा, पाऊस काही असो आपल्या ग्राहकांना दूध देण्यासाठी तत्पर असणारे शेतकरी औरंगपुरा येथील पोलीस चौकी समोरून गुलमंडीकडे जात असताना...
7/ 9
छत्रीचा आधार घेऊन औरंगपुरा येथून निराला बाजारकडे जाण्यासाठी रिक्षा स्टँडकडे येणाऱ्या महिला आणि महाविद्यालय तरुणी.
8/ 9
भाजी मंडई येथून निराला बाजाराकडे दुचाकीवर जाणारे मुलगा आणि वडील. दुचाकी चालवणाऱ्या मुलाचं आणि स्वतःच संरक्षण करण्यासाठी छत्री घेऊन दुचाकीवर मागे बसलेलं वडील.
9/ 9
फळविक्रेता स्वतःचा माल ताडपत्रीने झाकून घेतला. स्वतः रेनकोट टाकून औरंगपुरा येथून जात आहे.