मुलगी झाली हो...आनंदी झालेल्या बाबांनी 30 घरांमध्ये आणली 'समृद्धी', पाहा Photos
Joy of daughter birth : औरंगाबाद जिल्ह्यातील झोंड कुटुंबीयांनी घरात मुलीचं जल्लोषात स्वागत केलंय. मुलगी झाली म्हणून आनंद झालेल्या बाबांनी 30 घरांमध्ये समृद्धी आणलीय.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण सर्वांनी बरीच प्रगती केलीय. समाज पुढारला आहे, असं नेहमी सांगितलं जातं. त्यानंतरही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा आग्रह करणारे बरेच जण आहेत
2/ 8
औरंगाबाद जिल्ह्यातील झोंड कुटुंबीयांनी घरात मुलीचं जल्लोषात स्वागत केलंय. त्यांनी आपला आनंद साजरा करताना सामाजिक भानही जपलंय.
3/ 8
प्रवीण झोंड आणि विद्या झोंड यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात गावातील 30 मुलींचं मुलीचं टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडलं आहे.
4/ 8
झोंड कुटुंबीयांनी चक्क गावात दवंडी करत मुलींची नावं शोधली आहेत. 'ग्रामीण भागामध्ये सरकारी योजनांबाबत पुरेशी जागृती नसते. त्यामुळे त्यांनी दवंडीचा आधार घेतला.
5/ 8
'पदाधिकारी आणि यंत्रणांच्या माध्यमातून दवंडी देऊन मुलींची माहिती मागितली. त्यानंतर आमच्याकडे 30 मुलींची कागदपत्र जमा झाली. या सर्वांची खाती उघडली,' असं प्रवीण यांनी सांगितलं.
6/ 8
अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गावातील 30 मुलींची खाती उघडल्याचं झोंड कुटुंबीयांनी सांगितलं
7/ 8
राजमाता जिजाबाई यांच्या प्रेरणेवरुन झोंड कुटुंबीयांनी मुलीचं नाव जिजा असं ठेवलं आहे.
8/ 8
'आम्ही तिला शिकवून मोठं करणार असून समाजामध्ये मुलींबाबत असलेली नकारत्मकता कमी करण्यासाठी यापुढेही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत,' असं मुलीच्या आई विद्या झोंड यांनी सांगितलं.