छत्रपती संभाजीनगर येथील प्रयास युथ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पर्यावरण पूरक रंगोत्सव साजरा केला. यावेळी 350 झाडांना घेरु आणि चुना लावून होळी साजरी करण्यात आली. झाडांना रंग देण्यासाठी या टीमच्या स्वयंसेवकांनी स्वत: रंग तयार केले होते. यामध्ये गेरु आणि चुन्याचा समावेश होता. जलसंपदा विभागाच्या परिसरातील झाडांना यावेळी रंगण्यात आले. पर्यावरण पूरक रंगोत्सव सोहळ्यात एक चिमुकला सहभागी झाला होता. यावेळी त्यानेही झाडांना रंग दिला. या उपक्रमात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. त्यांनी आपण या विषयात जागृत असल्याचं दाखवून दिलं. वेगवेगळ्या वयोगटातील स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले होते.