औरंगाबाद शहरामध्ये यंदा चांगला पाऊस (Aurangabad Rain) झाला आहे. या पावसानंतर शहरातील प्रसिद्ध अशा बुद्ध लेणीच्या डोक्यावर असलेल्या डोंगरातून दुधासारखा धबधबा कोसळत आहे
|
1/ 7
औरंगाबाद, 5 ऑगस्ट : शहरामध्ये यंदा चांगला पाऊस झालाय. या पावसामुळे शहरातील प्रसिद्ध अशा बुद्ध लेणीच्या डोक्यावर असलेल्या डोंगरातून दुधासारखा धबधबा कोसळत आहे हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.
2/ 7
पाऊस चांगला पडल्यामुळे धबधबे सुरू झाले आहेत यामुळे शहरातील शाळा महाविद्यालयातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहेत. बुद्ध लेणीच्या डोक्यावर असलेल्या धबधब्याच्या खाली तरूणाईची चांगलीच गर्दी झाली होती.
3/ 7
पाऊस सुरू झाला आणि धबधबे सुरू झाले यामुळे शांत बसेल ती तरुणाई कशी. धबधबा पाहण्यासाठी गेले का तरुणाला ओला होण्याचा मोह आवरलं नाही पठ्ठ्याने चक्क शर्ट काढून पाण्याखाली मनमुराद आनंद घेतला.
4/ 7
या तरुणाचा फोटो काढण्यासाठी मित्राने चक्क पाण्यात अर्धा पाऊण तास घालवत त्याचा वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढले.
5/ 7
हा धबधबा पाहण्यासाठी शाळकरी मुले देखील गटागटाने आली होती यातील काही तरुण डोंगरावर गेले त्यामुळे त्यांचे काही सदस्य खाली होते इथं 'खूप छान धबधबे आहेत तुम्ही देखील वर या' असंच हा लहान मुलगा इतरांना सांगत आहे.
6/ 7
धबधब्याजवळ जाऊन फोटो काढण्यासाठी कशा पोस्ट द्याव्यात हे पाहताना दोन तरुणी मोबाईल मध्ये व्यस्त आहेत मोबाईल मध्ये पोस्ट बघून त्या फोटो काढताना दिसत आहेत.
7/ 7
हा धबधबा पाहण्यासाठी नवविवाहीत दाम्पत्य आले होते.यावेळी पत्नीला आधार देत तिला धबधब्याकडे हा तरूण घेऊन जात होता.