कोरोनाशी झुंज देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी केली गणपतीची प्रतिष्ठापणा, पाहा PHOTOS
दुसऱ्यांदा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी खासदार नवनीत राणा यांना होम क्वारन्टाइन राहण्याचा सल्ला दिला होता.
|
1/ 5
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या पती आमदार रवी राणा यांच्यासह मुंबई येथील निवासस्थानी होम क्वारन्टाइन असून त्यांनी मुंबईत घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केली.
2/ 5
खासदार नवनीत राणा यांच्यासह पती आमदार रवी राणा व राणा कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
3/ 5
नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 11 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र खासदार नवनीत राणा यांचा कोरोना अहवाल मुंबई मनपाने पॉझिटिव्ह दिला.
4/ 5
दुसऱ्यांदा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी खासदार नवनीत राणा यांना होम क्वारन्टाइन राहण्याचा सल्ला दिला होता.
5/ 5
त्यामुळे गेल्या 22 दिवसापासून नवनीत राणा कोरोनाशी लढत आहे. त्यांनी मुंबई येथील निवासस्थानी आज गणपती बसवत विधीवत पूजा करून आमदार रवी राणा यांच्यासह गणपतीची आरती करत लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना गणरायाकडे केली.