शेतकरी राजा समवेत कायम शेतात राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा (pola festival)
2/ 7
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून अकोला शहरात पोळा चौक आहे. या चौकांमध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आजही ही परंपरा या ठिकाणी कायम आहे.
3/ 7
शिंगे झुली, रंगीबेरंगी गोंडे, घुंगराची चंचाळे, बाशिंग, पितळी शेंबी, मोरक्या, कासरे, माटाट्या, कंबर पट्टा अशा साज पोळ्या निमित्त चढवला जातो. काही जोड्यांना तर चक्क चांदीच्या दागिन्यांनी सजावट करण्यात आली होती.
4/ 7
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने अनेक निर्बंध होते. मात्र, यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने आणि वर्षातून एकदाच येणाऱ्या हा सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
5/ 7
बैलजोडीची साज चढवून बँडच्या सहाय्याने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या घरी गोड पदार्थ बनवले होते.
6/ 7
पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
7/ 7
संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेकडून पोळ्याच्या दिवशी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलांना पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीचे पहिलं पारितोषिक जुने शहर भागात राहणाऱ्या गोपाल मांडेकर यांना मिळाले.