धनी जिंकले हो! अन् पत्नीने नवऱ्याला खांद्यावर उचलून मिरवले PHOTOS
या घवघवीत यशामागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायासाठी अशा पद्धतीने जल्लोष साजरा केला. (रायचंद शिंदे, प्रतिनिधी)


राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आणि निकाला नंतरचा जल्लोष सर्वत्र दिसत असताना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या एका विजयी उमेदवाराचा फोटो सोशल माध्यमात चांगलाच गाजतोय. त्याच कारणही तसंच आहे.


निवडणुकीत पत्नी विजयी झाली तर पतीला होणार आनंद आपण नेहमी पाहतो. या आनंदात तो पत्नीला खांद्यावर उचलून घेतो. मात्र, या गावात पती निवडून आल्यावर झालेल्या आनंदाने चक्की पत्नीने आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेऊन मिरवणूक काढली.


आपला पती ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर एका पत्नीने आपल्या पतीला खांद्यावर बसवून हा जल्लोष साजरा करत हा आनंद साजरा केला.


खेड तालुक्यातील आदिवासी भागातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव करत भाजपाच्या जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले.