भुसावळ शहरातील विभागीय रेल्वे हॉस्पिटलमध्ये एसीचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी- इम्तियाज अहमद, भुसावळ) आयसीयू वार्डमधील एसीचा गॅस रिफिल करताना स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी कर्मचाऱ्यांना रेल्वे रुग्णालयातच दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रेल्वे हॉस्पिटलमधील आयसीयू वार्डमधील एसी दुरुस्तीचं काम सुरू होते. एसीचा गॅस रिफिलिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. स्फोटात रेल्वे विभागातील इलेट्रॉनिक्स विभागातील 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले. एसी मॅकेनिक शशी शंकर व हेल्पर अखिलेश कुमार अशी जखमींची नावं आहेत.