

लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर 23 मे रोजी निकाल जाहीर झाले. ज्या EVMबद्दल विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते त्याचे निवडणूक झाल्यानंतर होते तरी काय असा प्रश्न अनेकांना पडत असेल.


लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी निवडणूक आयोगाने 40 लाख EVMचा वापर केला. जेणेकरून 90 कोटी भारतीय मतदार कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करु शकतील. 2019च्या निवडणुकीत 60 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.


मतदान झाल्यानंतर निकाला दिवसापर्यंत EVM कडक सुरक्षेमध्ये स्ट्रॉग रूममध्ये ठेवली जाते. या रूमध्ये EVM अंधारात ठेवली जातात. इतक नव्हे तर EVMच्या जवळपासन कोणतेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ठेवले जात नाही.


मतमोजणी झाल्यानंतर कागतोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा एकदा EVM स्ट्रॉग रूम मध्ये ठेवले जातात. स्ट्रॉग रूम पुन्हा एकदा सील केली जाते. ही सर्व प्रक्रिया संबंधित मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर केली जाते. या प्रक्रियेत संबंधित प्रतिनिधीची सही घेतली जाते.


निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवाराला 45 दिवसांची मुदत दिली जाते. या काळात कोणत्याही उमेदवाराला मतमोजणी प्रक्रियेवर काही शंका असेल तर तो उमेदवार पुन्हा मतमोजणी करण्यासाठी अर्ज दाखल करु शकतो.


या काळात EVMच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलाची असते. 45 दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा EVM सुरक्षेसह स्ट्रॉग रूममधून बाहेर काढले जातात. त्यानंतर आयोगाचे इंजिनिअर EVMची तपासणी करणार.