पावसाळ्यात बदलेलं तापमान पाहता आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. याकाळात महिलांनी स्वच्छतेची काळजी जास्त घ्यायला हवी. कारण या काळाच इनफेक्शन होण्याची जास्त भीती असते. पाळीच्या काळात जास्त स्वच्छता बाळगावी लागते.
2/ 8
अस्वच्छतेमुळे युरिन ट्रॅक इनफेक्शन किंवा योनी मार्गात इनफेक्शन होऊ शकतं. पीरियडमध्ये महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक हे जाणून घेऊयात.
3/ 8
बऱ्याच महिला पाळीच्या काळात सतत पॅड बदलत नाहीत.पण, पावसाळ्यात बॅक्टेरियल इन्फेक्शनची भीती जास्त असते. त्यामुळे दर 3 ते 4 तासांनी पॅड बदलायला हवा.
4/ 8
पाळीच्या काळात आपला प्रायवेट पार्ट खूप ओला असतो. पावसामुळे हवामानातही दमटपणा वाढलेला असतो. शौचालयात गेल्यानंतर किंवा पाण्याचा वापर करूनही प्रायवेट पार्टचा भाग कोरडा करत नाहीत.
5/ 8
त्यामुळे त्याभागात ओलावा आणखी वाढतो. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच,टॉयलेटमध्ये गेल्यावर किंवा पाण्याचा वापर केल्यानंतर खासगी भाग टिशू पेपरच्या सहाय्याने पूर्णपणे सुकवून त्यानंतर पॅड वापरा.
6/ 8
महिला पाळीच्या काळात खाजगी भाग साफ करण्यासाठी फक्त साधा साबण वापरतात. पण, त्यामुळे नैसर्गिक PH लेव्हलची पातळी खराब होऊ शकते. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट उपलब्ध आहेत ज्यामुळे स्वच्छता तर होतेच शिवाय PHची पातळी व्यवस्थित राहते.
7/ 8
मासिक पाळीच्या काळात झोपण्यापूर्वी दररोज रात्री कोमट पाण्याने आपला खाजगी भाग स्वच्छ करा. यानंतर टिशूने तो भाग पूर्णपणे कोरडा केल्यावरच पॅड वापरा. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.
8/ 8
पीरियड्स दरम्यान सार्वजनिक शौचालयांचा वापर न करणं चांगलं. वापरायचं असल्यास सॅनिटायझर किंवा टॉयलेट स्प्रे वापरा. शौचालय वापरण्यापूर्वी आधी फ्लश करा.