'हा' आहे जगातील सर्वात Handsome गणिताचा मास्तर, अनेकांना लाजवेल अशी आहे बॉडी- पाहा PHOTOS
पिएट्रो बोसल्ली (Pietro Boselli) असं या देखण्या शिक्षकाचं (Handsome teacher) नाव आहे. तो मुलांना गणित शिकवण्यासोबत मॉडेलिंगही (Modeling) करतो. इंटरनेटवर 'मॅथेमेटिकल मॉडेल' (Mathematical model ) म्हणूनही तो ओळखला जातो.


भारतातला एखादा शिक्षक मॉडेल पण असू शकतो, ही कल्पनाही आपल्याला करवत नाही. काही अपवाद वगळले तर आपल्या देशातल्या प्रत्येक शिक्षकाचं पोट किमान दोन बोटं तरी बाहेर आलेलं असतं. जगात एक असा व्यक्ती आहे, जो जगातील सर्वात 'हॅन्डसम गणिताचा टीचर' म्हणून ओळखला जातो. चला तर मग त्याच्याविषयी जाणून घेऊया...


पिएट्रो बोसल्ली असं या देखण्या शिक्षकाचं नाव आहे. तो 32 वर्षांचा असून गणित विषय शिकवतो. तो मुलांना गणित शिकवण्यासोबत मॉडेलिंगही करतो. मेकॅनिकल इंजिनिअर असणाऱ्या बोसलीला इंटरनेटवर 'मॅथेमेटिकल मॉडेल' म्हणूनही ओळखलं जातं. तो इटली या देशाचा रहिवाशी आहे.


आपण पाहतो की, जगभरातील बरेच मॉडेल दिसायला हॅन्डसम असतात, पण अभ्यासात मात्र त्यांच्या काही मेळ बसलेला नसतो. पिएट्रो बोसल्ली हा असा शिक्षक आहे, जो मॉडेल तर आहेच, पण त्याला गणिताची अत्यंत आवड आहे. हा हॅन्डसम मॅथ टीचर तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतो.


2016 मध्ये बोसेल्लीचा फोटो इंटरनेट आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, त्यानंतर तो फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळं मॉडेलिंग विश्वातही त्यांची मागणी वाढली.


गेल्या पंधरा वर्षांपासून बोसेल्लीला मॅथची आणि व्यायामाची आवड आहे. त्यानं या दोन्ही गोष्टींत अगदी समतोल राखला आहे. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये पीएचडीही केली आहे. सध्या तो विद्यार्थांना गणित विषय शिकवतो. त्यांन आतापर्यंत टॉमी हिलफिगर सारख्या नामांकित ब्रॅन्डसाठी देखील मॉडेलिंगचं काम केल आहे. बोसेल्लीला सध्या इन्टाग्राम वर 27 लाख फोल्लोवर्स आहेत.