

सामान्यपणे भारतातील प्रभवाशाली महिलांच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश होतो. मात्र यावेळी काहीसं वेगळं चित्र आहे. यावेळी भारतातील राजकीय, क्रिडा तसेच विदेशातील महिलांनी बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना मागे टाकत भारतातील टॉप 10 प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान पटकावलं आहे.


6 वेळा 'वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप'चं विजेतेपद पटकावणारी बॉक्सर मेरी कोम भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत सर्वात अव्वल स्थानावर आहे. तिचा स्कोअर 10.36 % आहे.


भारताच्या पहिल्या महिला आपीएस अधिकारी आणि पॉन्डेचरीच्या सध्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा स्कोअर 9.46 % एवढा आहे.


स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर भारतातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा स्कोअर 9.23% आहे


भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा स्कोअर 7.13 % आहे.


बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रभावशाली महिलाच्या यादीत यंदा पाचव्या क्रमांकावर आहे. तिचा स्कोअर 6.35 % आहे.


नोबल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिनं यंदा भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. तिचा स्कोअर 5.75 % आहे.


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांचाही भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश आहे. त्यांचा स्कोअर 5.53 % आहे.


ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. तिचा स्कोअर 5.11 % आहे.


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. तिची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. तिचा स्कोअर 5.10 % आहे.