अनेकांनी काहीना काही कारनामे करण्याची आवड असते. काहीजण आवड म्हणून रेकॉर्ड बनवत असतात. अशाचप्रकारे जर्मनीमधील एका व्यक्तीच्या नावे सार्वधिक वेळा बॉडी मॉडिफिकेशनचा रेकॉर्ड आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी 516 वेळा बदल केला आहे. रॉल्फ बुकोज असं या व्यक्तीचं नाव असून भविष्यातदेखील आणखी बदल करण्याचा त्यांचा मानस आहे. रॉल्फ बुकोज जर्मनीमधील आयटीमध्ये काम करतात. त्यांच्याप्रमाणेच असे अनेक जण आहेत ज्यांनी असे वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
सफरचंद तोंडात ठेवून ऑटोमॅटिक करवतीनं कापणे - लंडनमधील आर्टिस्ट जॉनी स्ट्रेंज यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांनी एका मिनिटात 8 सफरचंद तोंडात धरून ऑटोमॅटिक करवतीनं कापण्याचा रेकॉर्ड केला आहे. ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये त्यांनी हा विक्रम केला आहे. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
सर्वात जास्त ताणल्या जाणाऱ्या त्वचेचा रेकॉर्ड - ब्रिटनमधील गॅरी टर्नर यांच्या नावावर हा रेकॉर्ड असून त्यांनी आपली त्वचा 6.25 इंच लांब खेचून हा रेकॉर्ड नावावर केला होता. एका आजाराने ते पीडित असून याला एहलर्स डानलोस सिंड्रोम म्हटले जाते. यामध्ये त्वचा खूप सैल आणि लवचिक होते. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
शरीरावर सर्वात जास्त छिद्र पडण्याचा रेकॉर्ड - शरीरावर सर्वात जास्त छिद्र असण्याचा रेकॉर्ड हा एलाइन डेविडसन यांच्या नावावर आहे. जानेवारी 1997 मध्ये त्यांनी सर्वात आधी शरीरावर छिद्र करून घेतले होतं. त्यानंतर 8 जून 2006 पर्यंत त्यांनी शरीरावर 4225 छिद्र करून घेतली आहेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार विविध प्रकारचे दागिने घालण्यासाठी ती शरीरावर छिद्र करून घेते. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
सर्वात जास्त वेळ टेबल तोंडाने उचलणं - लक्जमबर्गच्या जॉर्जेस क्रिस्टेनने 12 किलो वजनाच्या टेबलला त्यावर बसलेल्या 50 किलोच्या मॉडेलसह आपल्या दातांनी उचलण्याचा रेकॉर्ड केला आहे. अशाच स्थितीत तो 38 फूट आणि 8 इंच पळालादेखील होता. 9 फेब्रुवारी 2008 मध्ये स्पेनच्या माद्रिदमध्ये त्याने हा रेकॉर्ड नोंदवला आहे. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
लोखंडाच्या तारा नाकातून घालून तोंडातून काढणे - अमेरिकेतील लास वेगासमधील साईड शो करणाऱ्या अँड्र्यू स्टंटन याने हा रेकॉर्ड केला आहे. मार्च 2012 मध्ये 11 फूट आणि 10.91 इंचाच्या लांब तारेला आपल्या नाकातून घालून तोंडातून बाहेर काढण्याचा रेकॉर्ड त्याने केला आहे. (फोटो सौजन्य - GUINNESS WORLD RECORDS)
सर्वात अधिकवेळा तोंड विचित्र करण्याचा रेकॉर्ड - इंग्लडमध्ये राहणाऱ्या एनी वुड्स हिने 1977 पासून 2010 पर्यंत विचित्र तोंडं करण्याच्या रेकॉर्डमध्ये 27 वेळा यश मिळवलं आहे. अनेकवेळा लहान मुलांना घाबरवण्यासाठी आपण विचित्र तोंड करत असतो. पण आता याचे देखील रेकॉर्ड होऊ लागले आहेत. इंग्लंडमध्ये इसवीसन 1267 पासून अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असून सर्वात जुन्या स्पर्धांपैकी तोंड वेडीवाकडी करण्याची ही स्पर्धा आहे. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
सर्वात जास्त केस असलेल्या कुटुंबाचा रेकॉर्ड - लॅरी गोमेज आणि डॅनी गोमेज आपल्या दोन मुलांसह आणि 19 कुटुंबातील सदस्यांसह राहतात. या परिवारातील सर्वांना मागील पाच पिढ्यांपासून कॉन्जेनिटल जेनरेलाइज्ड हाइपरट्रिचोसिस नावाचा आजार आहे. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात केस येतात. हे कुटुंब मेक्सिकोमध्ये राहत असून हे कपल मेक्सिकन नॅशनल सर्कसमध्ये काम करत आहे. (फोटो सौजन्य - GUINNESS WORLD RECORDS)
पायाच्या मदतीने बाण मारण्याचा रेकॉर्ड - 20 जून 2013 मध्ये कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमध्ये हा रेकॉर्ड बनवण्यात आला आहे. नॅन्सी साइफकर हिच्या नावावर हा रेकॉर्ड असून तिनं आपल्या पायाच्या मदतीने 20 फूट लांब बाण मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. सध्या गिनीज एक फूट लांब अंतरापर्यंत बाण मारायचं आव्हान देतं. परंतु नॅन्सीने साडेपाच इंचाच्या लक्ष्यावर नेम लावून हा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. नॅन्सी एका सर्कसमध्ये काम करते. फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)
सर्वात लांब मिशांचा रेकॉर्ड - मिशीची आणि दाढीची वाढ जास्त झाली तर सांभाळणं कठीण जातं. पण भारतातील रामसिंह चौहान यांच्या नावे सर्वात जास्त लांब मिशांचा रेकॉर्ड आहे. 14 फूट लांबीच्या त्यांच्या मिशा असून 4 मार्च 2010 ला इटलीच्या रोममध्ये मोजण्यात आल्या होत्या. (फोटो सौजन्य - GUINNESS WORLD RECORDS)
सर्वात जास्त गिनीज रेकॉर्ड नावावर असण्याचा विक्रम - 1979 मध्ये 6 तास 45 मिनिटांमध्ये 72 हजार जम्पिंग जॅक्स म्हणजेच दोरीच्या उड्या मारण्याचा विक्रम करून आश्रित फरमन याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले होते. त्यानंतर एका पोगो स्टिकवर उड्या मारत तीन बॉलचं जगलिंग करत एक मैल अंतर जाण्याचा रेकॉर्ड त्याने केला. त्याचबरोबर लांब लाकडावर चढून पर्वतारोहणाचा रेकॉर्डदेखील त्याच्या नावावर आहे. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त रेकॉर्ड त्याने तोडले असून 120 पेक्षा जास्त रेकॉर्डची नोंद त्याच्या नावावर आहे. (फोटो सौजन्य- GUINNESS WORLD RECORDS)