World Population Day : ही आहेत जगातली सर्वाधिक गर्दीची 10 शहरं; तुमचं शहर कितवं ते पाहा
World Population Day - जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ही यादी पाहाच. जगभरातल्या सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातली शहरं अव्वल स्थानी आहेत. या यादीत देशातली कुठली शहरं आहेत आणि कितव्या नंबरवर आहेत पाहा...


मुंबई, भारतः सलग दुसऱ्या वर्षीही मुंबईचा जगातल्या सर्वात जास्त गर्दी असाणाऱ्या शहरांमध्ये समावेश झाला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक रहदारी आहे आणि त्याचं प्रमाण 65 टक्के इतकं आहे. जास्त लोकसंख्या, रस्तांसाठी जागेचा अभाव आणि अयोग्य पायाभूत सुविधा हे काही मुख्य घटक रहदारीच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. मुंबईच्या लोकसंख्येचं प्रमाण 1.84 कोटी इतकं असल्याचं 2011 च्या जनगणनेत नमूद केलं आहे. (फोटोः Reuters)


बोगोटा, कोलंबिया बोगोटा या कोलंबियन राजधानी शहरामध्ये गर्दाचं प्रमाण 63 टक्के इतकं आहे. याविषयी करण्यात आलेल्य़ा अभ्यासात अशी माहिती सांगितली आहे की, बोगोटामध्ये राहणारे लोक वर्षातून एकदा तरी कामावरून घरी जाताना किंवा उलट दिशेने जाताना रस्त्यात ट्रॅफिक जॅममध्ये अडकतात. (फोटोः Reuters)


लिमा, पेरू : लिमा शहराच्या गर्दीचं प्रमाण 58 टक्के इतकं आहे. खरं तर, कामाच्या दिवसांमध्ये आणि पीक अवर्समध्ये हे प्रमाण 83 टक्क्यांपर्यंत पोहोचतं. इतक्या जास्त प्रमाणातली गर्दी आणि बेशिस्त कारभार या शहरात मृत्यूचं कारण ठरला आहे. म्हणजे, अनियमित आणि शिस्त नसलेली वाहतूक व्यवस्था आणि त्यामुळे होणारे मृत्यूचं प्रमाण इथे जास्त आहे. (फोटोः Reuters)


दिल्ली, भारतः भारताची राजधानी असणारं शहर म्हणजे दिल्लीचा देखील या यादीत समावेश आहे. दिल्लीमधलं गर्दीचं प्रमाण 58 टक्के आहे तर कामाच्या दिवसांमध्ये हे प्रमाण वाढतं. सकाळी जेव्हा ऑफिसला जाणाऱ्यांची रहदारी असते तेव्हा हे प्रमाण 73 टक्क्यांपर्यंत पोहोचतं तर, संध्याकाळी याची पातळी 93टक्के इतकी होते. (फोटोः Reuters)


मॉस्को, रशियाः जे लोक मॉस्कोमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांना नक्कीच ट्रॅफिक जॅमचा अनुभव नित्याचा आहे याची खात्री पटेल. मॉस्कोमध्ये त्याचं प्रमाण 56 टक्के आहे. तर, काही वेळा ही पातळी 125 टक्क्यांचा आकडाही गाठते. (फोटोः Reuters)


इस्तंबूल, टर्कीः हे युरोपमधलं दुसरं शहर आहे जे गर्दी आणि ट्रॅफिकच्या टक्केवारीत पुढे आहे. 53 टक्के रहदारीचं प्रमाण असणाऱ्या शहरात वाहनचालक 53 टक्क्यांहून अधिक वेळा ट्राफिकमध्ये अडकतो. (फोटोः Reuters)


जाकार्ता, इंडोनेशियाः 53 टक्के इतकं रहदारीचं प्रमाण असणाऱ्या या इंडोनेशियाच्या राजधानीचा यादीत सातवा क्रमांक लागतो. जाकार्तामध्ये संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत सर्वांत जास्त ट्रॅफिक असतं.


बॅंकॉक, थायलंडः बॅंकॉकमध्ये रहदारीचं प्रमाण 53 टक्के इतकं असून तिथली परिस्थिती बिकट असण्याचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यांचं काम. असं असलं तरी हे शहर त्याच्या अनोख्या स्ट्रीट लाईफसाठी प्रसिद्ध आहे.


मेक्सिको सिटी मेक्सिकोच्या या राजधानीच्या शहरात रहदारीचं प्रमाण 52 टक्के इतकं असून वाहतुकीसाठी लागणारा वेळ खूप जास्त आहे. रहदारीच्या या प्रमाणाचा परिणाम मेक्सिकोच्या आर्थिक वाढीवरदेखील झाला आहे.