World Heart Day: जास्त घाम येतो आणि पायांवर सूज आहे? दुर्लक्ष करू नका, असू शकतात Heart Attack ची लक्षणं
World Heart Day 2021: हृदयविकाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन पाळला जातो . हृदयविकाराची काही सौम्य लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का?
छातीत दुखणे : अनेकदा आपल्याला काम करत असताना आपल्या छातीत कळ येते. छातीवर दबाव जाणवतो. गॅस किंवा अॅसिडिटी म्हणून याकडे दुर्लक्ष नको. हार्ट अटॅकचा तो धोका असू शकतो. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
2/ 8
अति घाम येणे : काहीही काम न करता किंवा व्यायाम न करताही खूप घाम ये मोठ्या प्रमाणात घाम येत असेल तर तेही कमजोर हृदयाचं लक्षण आहे. हृदयरोगाशी संबंधित हे लक्षण नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
3/ 8
चक्कर येणे : डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा चक्कर येणं यासारखे प्रकार घडत असतील तर शरीराला रक्तपुरवठा व्यवसथित नसल्याचं ते लक्षण आहे. हृदयाचं कार्य योग्य प्रकारे चालत नसल्यानं हे होतं.
4/ 8
उलटी किंवा पोट खराब होणे : सतत पोट खराब होणं, मळमळ आणि उलटी होणे हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण आहे. त्यामुळे योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
5/ 8
पायांना सूज येणे : पायांवर सातत्याने सूज येणं किंवा घोट्यांवर सूज ही हार्ट अटॅकची लक्षणं आहेत. त्या भागात रक्तपुरवठा अनियमित झाल्यानं असं होतं.
6/ 8
रक्तदाबाची समस्या : आपल्या आई-वडिलांपैकी कुणाला रक्तदाबाचा त्रास असेल ब्लड प्रेशर तपासत राहिलं पाहिजे. हाय ब्लड प्रेशर असलेल्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. वेळीच उपचार घेतले तर धोका कमी होऊ शकतो.
7/ 8
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण : कोलेस्ट्रॉल हा रक्तातला महत्त्वाचा घटक आहे. परंतु त्याचं प्रमाण अतिरिक्त वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये अडसर निर्माण होतो आणि हार्ट अटॅक येण्याचा संभव असतो. त्यामुळे रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे.
8/ 8
रक्तात साखरेचे प्रमाण : आपल्या शरीरातील रक्तात साखरेचं प्रमाण हे संतुलित असणं आवश्यक आहे. डायबेटिस असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.