World Environment Day 2021: हे 14 प्रकारचे जीव पाहणारी आपली पिढी ठरू शकते शेवटची; प्रजाती नष्ट होण्याची मार्गावर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अशा 14 प्रजातींची ओळख ज्या नामशेष होऊ शकतात. मानवी हस्तक्षेपामुळेच त्यांची परिसंस्था संपुष्टात येऊ लागली आहे. आपली पिढी यांना बघणारी शेवटची कदाचित.
माश्या: मधमाशा. गांधील माशा आणि अशा वेगवेगळ्या जंगली माशांच्या प्रजातींना धोका आहे. कारण त्यांना कीटकनाशकं, निओनिकोटीनोईड्स आणि जीएमओचा वाढता वापर. जगातल्या वन्य माश्यांपैकी एक चतुर्थांश प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
2/ 14
जिराफ : जगातील सर्वात उंच सस्तन प्राण्यांची संख्या1985 मध्ये 115500 होती ते 2018 मध्ये फक्त 80 हजारांवर आली आहे. जिराफाची त्यांच्या शेपटी आणि मांसासाठी शिकार केली जाते.
3/ 14
कोरल रिफ्स: जगभरातील पंचवीस टक्के प्रवाळ म्हणते Coral reef चं सागरी प्रदूषणामुळे झालेलं नुकसान सुधारणेच्या पलीकडे असल्याचं मानलं जातं. जवळजवळ 65 टक्के प्रवाळांच्या जाती गंभीर धोक्यात आहेत
4/ 14
ग्रेट एप्स: गोरिल्ला, ओरँगउटान, चिंपांझी आणि बोनोबोस या मोठ्या वानरांच्या चार प्रजाती दुर्मीळ होत चालल्या आहेत. शेती, जंगलातलं अतिक्रमण यामुळे त्यांची परिसंस्थाच नष्ट झाली आहे.
5/ 14
सी टर्टल्स: सागरी कासवांना देखील किनारपट्टीचा विकास, अनिर्बंध मासेमारी, प्लास्टिक प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगचा धोका आहे.
6/ 14
कीटक: हवामानातील बदल हा कीटकांसाठी सर्वाधिक धोका आहे. मानवाने कीटकनाशकांचा वाढता वापर करणं देखील यांच्या प्रजाती भराभर नामशेष होण्यामागे आहे.
7/ 14
पक्षी: पक्षांना जंगलतोड, हवामान बदल आणि तीव्र हवामान, प्लास्टिक आणि कीटकनाशकांचा धोका आहे. तस्करीमुळेही काही दुर्मीळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
8/ 14
खेकडे: समुद्रातला अधिवास प्रदूषणामुळे धोक्यात आल्याने खेकड्यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत.अनिर्बंध मच्छीमारी, प्लास्टिक प्रदूषण विशेषतः मायक्रोप्लास्टिक जे खाण्याच्या साखळीतून प्रवास करून खेकड्यांपर्यंत पोहोचतं आणि त्यांचा जीव घेतंय.
9/ 14
शार्क्स: हवामानातील बदल त्यांच्या निवासस्थानामध्ये बदल घडवून आणतात आणि त्यांच्या पुनरुत्पादनाच्या आणि अन्ना शोधण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.
10/ 14
PLANTS: There are more than 380,000 different plant species onवनसंपती: पेस्टीसाईडस त्यांच्या परागकणांना हानी पोहोचवू शकतात, तर पीक पेटंट्स जैवविविधता कमी करतात
11/ 14
हत्ती: जमिनीवरचा मोठा सस्तन शाकाहारी प्राणीच अस्तित्वासाठी लढतो आहे. हस्तिदंत आणि कातडीसाठी दरवर्षी 20 हजारांहून अधिक हत्तींची शिकार होते. लोकसंख्येमुळे झालेली जंगलतोड आणि हवामान बदलांमुळेही हस्तींची संख्या कमी होते आहे.
12/ 14
मासे: कचरा, खतं आणि तेलामुळे होणाऱ्या समुद्री प्रदूषणात अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. दुर्मीळ सी फूड म्हणून मानवाचे चोचले पुरवत असल्यानेही काही प्रजाती धोक्यात आहेत.
13/ 14
व्हेल्स: जल व ध्वनी प्रदूषणामुळे व्हेलला धोका निर्माण झाला आहे, व्यावसायिक मासेमारीची साधनं, शिकार आणि हवामानातील बदलामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे.
14/ 14
झाडे: इकोसिस्टिमचा जंगल हा गाभा. जंगलच सुरक्षित नाही. त्यामुळे त्यावर अवलंबून परिसंस्था धोक्यात आहे. जंगलतोड, हवामान बदल, आणि वणवे यामुळे अनेक झाडांच्या प्रजाती नामशेष होत आहेत.