

HIV म्हणजे औषधं घेऊनच या आजारावर नियंत्रण ठेवता येतं किंवा बोनमॅरो ट्रान्सप्लांट करून रुग्णाला बरं करता येतं. मात्र आता एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये रुग्णाने यापैकी काहीच न करता HIV वर मात केली आहे. या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीनेच व्हायरसने पूर्णपणे नाश केला आहे आणि ती बरी झाली आहे.


याआधी HIV ग्रस्तांच्या शरीरात दोन वेळा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून ते बरे झाले आहेत. त्यानंतरदेखील शरीरात HIV व्हायरस झपाट्याने कमी झाला आणि पुन्हा त्याची लागण झाली नाही. मात्र जर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कोणत्याही मदतीशिवाय HIV शी लढून त्याचा नाश करते, असं हे पहिलंच प्रकरण आहे.


26 ऑगस्ट रोजी सायन्स मॅगझिन नेचरमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार या रुग्णाच्या शरीरात HIV चा सक्रिय व्हायरस नाही. याचा अर्थ ही व्यक्ती HIV ने संक्रमित झाली आणि आपोआप बरीदेखली झाली. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील 150 कोटी पेशींची तपासणी केली. या रुग्णाला EC2 असं नाव देण्यात आलं होतं.


आणखी एका रुग्णाची तपासणी करण्यात आली, त्याला EC1 असं नाव देण्यात आलं. त्याच्या शरीरातील 100 कोटी पेशींची तपासणी करण्यात आली. त्याच्या शरीरात फक्त एक सक्रिय व्हायरस सापडला मात्र तोदेखील जेनेटिकली निष्क्रिय होता. याचा अर्थ या दोन्ही रुग्णांच्या शरीरातील जेनेटिक्स असे आहेत, ज्यांनी दोघांच्या शरीरातील HIV ची सक्रियता संपवली.


शास्त्रज्ञांनी 64 एलिट कंट्रोलर्सच्या (EC) शरीरातील HIV संक्रमणाचा अभ्यास केला. एलिट कंट्रोलर्स म्हणजे असे लोक ज्यांच्या शरीरात एचआयव्ही आहे मात्र तो पूर्णपणे निष्क्रिय आहे किंवा इतक्या कमी प्रमाणात आहे की कोणत्याही औषधांशिवाय तो रुग्ण बरा होऊ शकतो.


यामध्ये 41 लोक एचआयव्हीची औषधं घेत होते. मात्र EC2 रुग्णाने कोणतंही औषध घेतलं नाही. त्याच्या शरीरात HIV पूर्णपणे निष्क्रिय आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कदाचित या दोन्ही रुग्णांच्या शरीरात कमजोर HIV असेल. या रुग्णांच्या शरीरात एचआयव्हीची लक्षणं किंवा त्यामुळे होणारे दुष्परिणामही दिसून आले नाहीत.


कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत HIV वर संशोधन करणारे सत्या दांडेकर म्हणाले, ही काही महिने किंवा काही वर्षांची बाबत नाही. तर खूप कालावधीपासून विकसित होणारी रोगप्रतिकारक प्रमाणी आहे. जगभरात 3.50 कोटी लोक एचआयव्ही संक्रमित आहेत. त्यापैकी 99.50% रुग्णांना अँटिरेट्रोव्हायरल म्हणजे एचआयव्हीची औषधं घ्यावी लागतात. औषधांशिवाय या आजारावर नियंत्रण अशक्य आहे.


सत्या यांच्या मते, आतापर्यंत कोणत्या शास्त्रज्ञाने एलिट कंट्रोलर्सची रोगप्रतिकारक प्रणाली आणि एचआयव्हीमध्ये होणाऱ्या संघर्षाची नोंद ठेवली असेल किंवा त्याचा रिपोर्ट तयार केला असेल. आपण सर्वांनी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीमार्फत एचआयव्हीवर होत असलेल्या पहिल्या हल्ल्यावर लक्ष दिलं नाही. त्यामुळे जोपर्यंत कुणी एलिट कंट्रोलर घोषित केला जातो, तोपर्यंत त्या व्यक्तीने HIV वर मात केलेली असते.