मुलगी नोकरी करणारीच हवी; लग्न करताना मुलाची का असते अशी अट?
अरेंज मॅरेज (Arranged marriage) करताना बहुतेक मुलांची आणि मुलाच्या कुटुंबाची एक अट असते, ती म्हणजे नोकरी करणारी मुलगी (Working woman) हवी.
|
1/ 5
आपल्या आयुष्यात येणारी मुलगी कुटुंबाचा सांभाळ तर करेलच सोबतच ती आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र असायला हवी. तिला पतीच्या पैशांवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये. स्वत:चा खर्च ती स्वत: उचलेल
2/ 5
मुलगी नोकरी करणारी असेल तर ती घरातील खर्चात आपल्याला मदत करू शकते. घरातील खर्च वाटून घेता येतो.
3/ 5
तुमचा जोडीदारही नोकरी करत असेल, तर तुमचं आयुष्य त्याला चांगल्या प्रकारे समजतं. ऑफिसमध्ये दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर पत्नी आपल्या समस्या जाणून घेते आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या मनावरील ताण हलका करते.
4/ 5
नोकरी करणाऱ्या महिलेला घरासह बाहेरच्या जगाचं ज्ञानही असतं. त्यामुळे लाइट बिल भरणं, बँकेची काम किंवा इतर अशी बरीच छोटी छोटी कामं ती करू शकते. त्यामुळे तिच्या पतीवर भार कमी होतो.
5/ 5
पती-पत्नी दोघंही कमावते असतील तर उत्पन्न जास्त येतं. त्यामुळे भविष्यासाठी बचत करता येऊ शकते. भविष्यात पैशांची गरज लागल्यास कुणासमर हात परसण्याची वेळ येत नाही.