#ChallegeAccepted असं म्हणत तुमच्याही मैत्रिणीने, बहिणीने Instagram वर ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला आहे का?
#ChallegeAccepted असं म्हणत तुमच्याही मैत्रिणी, बहिणी ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट करत आहेत का? कारण वाचण्यासाठी स्क्रोल करा
|
1/ 11
तुमच्या बहिणींच्या, मैत्रिणींच्या, ओळखीच्या मुलींच्या किंवा तुम्ही फॉलो करत असणाऱ्या woman सेलेब्रिटींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक अँड व्हाइट सेल्फी तुम्ही इतक्यात पाहिली असेलच.
2/ 11
#ChallegeAccepted असं म्हणत अनेक स्त्रिया Insagram वर आपले कृष्णधवल फोटो शेअर करत आहेत.जगभरात हा कसला नवा ट्रेंड आहे माहीत आहे का?
3/ 11
#WomenSupportingWomen #WomenInspiringWomen नावाची ऑनलाइन चळवळ सध्या जगभरात सुरू आहे आणि ही ऑनलाइन फोटोंची शृंखला त्याचाच भाग आहे.
4/ 11
सामान्यांपासून सेलेब्रिटी स्त्रियांपर्यंत सगळ्या जणी याचा आनंदाने भाग होत आहेत. तारा शर्माने शेअर केलेला हा फोटो
5/ 11
भारतातही मलायका अरोरा, दिया मिर्झा, सारा अली खानसारख्या सेलेब्रिटींनी ब्लॅक अँड व्हाइट फोटो टाकायला सुरुवात केल्यानंतर तर ही लाट भारतात वेगाने पसरत आहे.
6/ 11
कणखर स्त्रिया कायमच एकमेकींना उभारी देतात, असं लिहित दिया मिर्झाने #WomenInspiringWomen या ऑनलाइन चळवळीत भाग घेतला आणि आणखी काही सेलेब्रिटींना टॅग केलं.
7/ 11
किम शर्माने टॅग केल्यावर उर्मिला मातोंडकरनेही तिचा फोटो शेअर केला. स्त्रियांनी एकमेकींना साथ देणं ही स्त्री सबलीकरणाची पहिली पायरी असल्याचं तिने नमूद केलंय.
8/ 11
एकमेकींना टॅग करत ही शृंखला पुढे नेली जात आहे आणि काही दिवसातच जगभरात ही लाट आली आहे. सारा अली खाननेही यात फोटो पोस्ट केला.
9/ 11
अनन्या पांडेनेसुद्धा आणखी काही जणांना टॅग करत नारीशक्तीचा जयजयकार केला आहे.
10/ 11
मलायकाने बिपाशा बासूला टॅग करत #ChallegeAccepted असं म्हटलं आणि मग बिपाशानेसुद्धा एक थ्रोबॅक पिक शेअर केला.
11/ 11
अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करण्याचा ट्रेंड नवा नाही. पण जगभरात एकाच वेळेला स्त्रियांनी एका विचाराने एकत्र येत अनौपचारिक ट्रेंड निर्माण करणं नवं आहे