ब्रेस्ट जड होण्याचं सामान्य कारण म्हणजे फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट चेंजेस (fibrocystic breast changes). हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार मेयो क्लिनिकच्या मते, निम्म्या महिलांना आयुष्यात कधी ना कधी ही समस्या उद्भवते. ब्रेस्ट कॅन्सर नसतो मात्र तसे बदल स्तनांमध्ये दिसू लागतात. ब्रेस्ट टिश्यूमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं. अशी समस्या एका किंवा दोन्ही ब्रेस्टमध्ये होऊ शकते. यावेळी ब्रेस्ट जड होण्यासह ब्रेस्टमध्ये सरकती गाठ, वेदना, काखेजवळ वेदना, निपल्समधून हिरव्या किंवा ब्राऊन रंगाचा डिस्चार्ज अशी लक्षणंही दिसतात.
मासिक पाळीच्या कालावधीत तर ब्रेस्ट जड झाल्यासारखे वाटतात. काही महिलांच्या ब्रेस्टमध्ये वेदनाही होतात. याला सायक्लिकल ब्रेस्ट पेन (cyclical breast pain) म्हटलं जातं. मासिक पाळीदरम्यान एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत बदल होतात. त्याचा परिणाम ब्रेस्टवरही होतो. ब्रेस्टमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता वाढते आणि ब्रेस्ट जड होतात. ही समस्या दोन्ही ब्रेस्टमध्ये होते.
ब्रेस्टला सूज किंवा जड होणं हे प्रेग्नन्सीचं पहिलं लक्षण आहे. गर्भधारणेच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात हे लक्षण दिसू लागतं. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात आणि त्याचा परिणाम ब्रेस्टवर दिसून होतात. ब्रेस्ट जड वाटणं, त्याला खाज सुटणं, ठणके बसणं आणि नेहमीपेक्षा आकारानं मोठेही दिसू लागतात. सोबत मळमळ, उलटी, थकवा, ठरलेल्या कालावधीत मासिक पाळी न येणं किंवा स्पॉटिंग अशी लक्षणंही दिसतात.
तुम्ही बाळाला ब्रेस्टफिंडींग करत असाल तरीदेखील ब्रेस्ट जड होतात, निपल्समध्ये वेदना होतात. ब्रेस्टमध्ये जेव्हा दुधाचं प्रमाण जास्त होतं, ज्याला engorgement असं म्हटलं जातं. त्यावेळी अशी समस्या उद्भवते. स्तनपानाच्या पहिल्या आठवड्यात सामान्यपणे ही समस्या दिसून येते. मात्र त्यानंतर कधीची दिसू शकते. तुम्ही जेव्हा बाळाला दूध पाजत नसाल किंवा ब्रेस्टमधून दूध काढलं नसेल तेव्हा अशी समस्या जाणवते.
Mastitis हे ब्रेस्ट इन्फेक्शन आहे. ज्या महिला बाळाला दूध पाजतात त्यांना हे इन्फेक्शन होतं. ब्रेस्ट जड होतं, ब्रेस्टला सूज येते. जेव्हा दूध ब्रेस्टवर राहतं तेव्हा बॅक्टेरिया वाढू लागतात. जेव्हा डक्टमध्ये दूध राहतं किंवा तुमच्या शरीरावरील, बाळाच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या निपलमार्फत आत जातात तेव्हा हे इन्फेक्शन होतं.