International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट
महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या बळावतात. या समस्यांचं निदान लवकरात लवकर होण्यासाठी महिलांनी या आरोग्य चाचण्या (woman health test) जरूर करून घ्याव्यात.
ब्लडप्रेशर - विशीनंतर किमान 2 वर्षांतून एकदा तरी रक्तदाब चाचणी करून घ्यावी.
2/ 11
कोलेस्ट्रॉल - यामुळे हृदयाच्या आजारांचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. 20 व्या वयानंतर 5 वर्षातून एकदा तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासून घ्यावी.
3/ 11
पॅप स्मिअर्स (Pap Smears) - 21 ते 65 वयात प्रत्येकी 3 वर्षांनी पॅप स्मिअर्स टेस्ट करून घ्यावी. यामुळे सर्व्हिकल कॅन्सरचा धोका असल्यास लवकर निदान होतं.
4/ 11
मॅमोग्राम - ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान होण्यासाठी ही चाचणी गरजेची आहे. चाळीशीनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो, त्यामुळे या वयानंतर दर दोन वर्षांनी मेमोग्राम करून घ्यावं.
5/ 11
बोन डेन्सिटी स्क्रिनिंग - वाढत्या वयानुसार हाडांच्या समस्या बळावतात. त्यामुळे वयाच्या पासष्टीपासून महिलांनी Osteoporosis साठी बोन डेन्सिटी टेस्ट करून घ्यावी
6/ 11
ब्लड ग्लुकोज टेस्ट - 45 वयानंतर दर 3 वर्षांनी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी, जेणेकरून डायबेटिज किंवा प्रीडायबेटिजचं निदान होईल.
7/ 11
कोलोन कॅन्सर स्क्रिनिंग - वयाच्या पन्नाशीपासून कोलोन कॅन्सरची तपासणी सुरू करावी. यामध्ये sigmoidoscopy किंवा colonoscopy केली जाते. कोलोना कॅन्सरचा धोका ओळखणअयासाठी दर 5 वर्षांनी sigmoidoscopy करावी आणि दर 10 वर्षांनी colonoscopy करावी.
8/ 11
बॉडी मास्क इंडेक्स - अठराव्या वयापासून लठ्ठपणाबाबत चाचणी करून घ्यावी. यासाठी बॉडी मास्क इंडेक्स तपासून घ्यावा. यामुळे तुम्ही लठ्ठ आहात की नाही हे समजेल, शिवाय लठ्ठपणामुळे बळावणारे आजार दूर ठेवता येतील.
9/ 11
स्किन एक्झामिनेशन - प्रत्येक महिलेन महिन्याला घरच्या घरी आपल्या त्वचेची तपासणी करावी. त्वचेमध्ये काही बदल दिसले, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ही स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात.
10/ 11
डेन्टल चेकअप - दातांचं आरोग्य चांगलं असल्यास बऱ्य़ाच आजारांना दूर ठेवता येतं. महिलांनी वर्षातून दोनदा तरी दातांची तपासणी करून घ्यावी. दात किडणं, हिरड्यांच्या समस्या असल्यास गंभीर होणार नाहीत.
11/ 11
सूचना - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.