

रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणं. सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 55 व्या वर्षी महिलेला मेनोपॉज येऊ शकतो. या कालावधीत योनीतून होणारा रक्तस्राव बंद होतो मात्र काही स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होतो.


रजोनिवृत्तीनंतर पुन्हा पाळी वा रक्तस्राव होणं ही धोक्याची घंटादेखील असू शकते. रक्तस्त्राव होण्यामागे अशी अनेक कारणं आहेत ती देखील समजून घेणं आवश्यक आहे.


गर्भाशयाच्या आतल्या आवरणाची जाडी कमी होते. अंडाशय लहान होतं. त्यामुळे त्यातील एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॅान हार्मोन्स कमी होतात.


नवी मुंबईतील खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रतिमा थमके यांनी सांगितलं, मेनोपॉजनंतर तुम्हाला केवळ स्पॉटिंग होत असेल किंवा जास्त रक्तस्त्राव ही कॅन्सरची लक्षणं असण्याची शक्यता दहा टक्के असते.