फुफ्फुसाचा कॅन्सर (Lung cancer) - पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर कमी वयात होतो. सुरुवातीच्या टप्प्यात होणाऱ्या फुफ्फुसाच्या कॅन्सरला प्रायमरी लंग कॅन्सर म्हणतात. त्यानंतर हा कॅन्सर शरीरातील कोणत्याही भागात पसरतो, तेव्हा त्याला सेकंडरी लंग कॅन्सर म्हटलं जाते. खोकला, छातीत वेदना, श्वास घेण्यात त्रास, खोकताना रक्त पडणे, ताप ही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत.