Winter Tips : केसगळतीची समस्या मुळापासून संपेल; आहारात सामील करा हे पदार्थ
हिवाळा तुमच्या केसांवर वाईट परिणाम करू शकतो. परिणामी केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. परंतु असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने केस अधिक चमकदार आणि दाट होतात.
E Times ने दिलेल्या माहितीनुसार, केसांच्या आरोग्यासाठी प्रोटिन्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आवश्यक असतात. काही पदार्थ तुम्हाला हे सर्व देऊ शकतात. हे पदार्थ खाल्यास तुमचे केस गाळाने थांबते आणि केस अधिक चमकदार होतात.
2/ 8
आपले केस प्रोटीनपासून बनलेले असतात, त्यामुळे त्यांना प्रोटीन आवश्यक असते. ते ना मिळाल्यास केस गळतात आणि कोरडे होतात. अंडी, चिकन, मासे, टर्की आणि दुग्धजन्य पदार्थ प्रोटीनचे चांगतले स्रोत आहेत.
3/ 8
लोहाची कमतरता झाल्यास अशक्तपणासोबत केसही गळतात. त्यामुळे तुमच्या आहारात लोह किंवा लोह पूरक पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. यासाठी तुम्ही डाळी, पालक, लाल मांस, चिकन, मासे, ब्रोकोली, सॅलड, हिरव्या भाज्या खाऊ शकता.
4/ 8
ग्रीक योगर्ट तुमच्या टाळूतील रक्तप्रवाहास आणि केसांच्या वाढीस मदत करतात. केस पातळ होणे आणि गळणे यासाठीही हे फायदेशीर आहे.
5/ 8
सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल सारख्या माशांमध्ये हेल्दी ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात. तुमच्या शरीराला केस वाढवण्यासाठी आणि ते चमकदार आणि भरलेले ठेवण्यासाठी देखील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आवश्यक असते.
6/ 8
केसांसाठी व्हिटॅमिन सीदेखील आवश्यक असते. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे केसांच्या शाफ्टला पुरवठा करणार्या केशिका मजबूत करते. काळ्या मनुका, ब्लूबेरी, ब्रोकोली, पेरू, किवी, संत्री, पपई, स्ट्रॉबेरी, रताळे हे व्हिटॅमिन सीचे स्रोत आहेत.
7/ 8
अव्होकाडो व्हिटॅमिन ईचे उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे केसांच्या वाढीस समर्थन देऊ शकतात. व्हिटॅमिन ई टाळूच्या त्वचेचे रक्षण करते. टाळूवरील खराब झालेल्या त्वचेमुळे केसांची गुणवत्ता खराब होते आणि केसांचे फॉलिकल्स कमी होऊ शकतात.
8/ 8
बीन्स आणि सोयाबीन हे प्रोटीनचे उत्तम वनस्पती-आधारित स्त्रोत आहेत, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. बीन्स झिंकचा चांगला स्रोत आहे, जो केसांची वाढ आणि दुरुस्ती चक्राला मदत करतो.