Winter Health Tips : हिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला
हिवाळ्यात आपल्याला आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हंगामी आजार. हिवाळ्यात सर्दी खोकला यांचा त्रास खूप वाढतो. मात्र काही सुपरफूडसच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेऊ शकता.
बाजरी : बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B असते. बाजरी आपल्या स्नायूंची वाढ आणि केसांच्या पुनरुत्पादनासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही बाजरीची भाकर, लाडू, खिचडी किंवा भाजणीच्या थालीपीठामध्ये बाजरी खाता येते.
2/ 11
हिरव्या पालेभाज्या : पालक, मेथी, पुदिना, हिरवा लसूण या हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटी इंफ्लामेंटरी गुणधर्म असतात, जे हात आणि पायातील जळजळ कमी करतात. करी, रायता, डाळ किंवा चटणीमध्ये टाकून तुम्ही या भाज्या खाऊ शकता.
3/ 11
कंदमुळे : रताळे, गाजर, मुळा यांच्यासारखे कंदमुळे वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. हे तुम्ही तुम्हाला वाढेल त्या पद्धतीने खाऊ शकता.
4/ 11
डिंक : डिंक तुमच्या हाडांसाठी आणि पचनासाठी फायदेशीर असतो. लाडूमध्ये डिंक घालून किंवा डिंकाचे पाणी तुम्ही आहारात सामील करू शकता.
5/ 11
तीळ : तिळामध्ये आवश्यक फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन E असते. हे तुमची हाडं, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. चिक्की, लाडू किंवा चटणीमध्ये टाकून तुम्ही तीळ खाऊ शकता.
6/ 11
हंगामी फळ : पेरू, सीताफळ, सफरचंद अशी हंगामी फळं मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि फायबरने भरपूर असतात. छान पिकलेली ताजी फळं खाल्याने तुमच्या बारोग्याला तर त्याचा फायदा होतोच मात्र तुमची त्वचाही हायड्रेटेड राहाते.
7/ 11
तूप : तुपामध्ये आवश्यक फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन D, A, E असतात. तूप तुम्ही कशाही पद्धतीने खाऊ शकता. खिचडीवर घालून किंवा पोळी आणि भाकरीवर लावूनही तूप खाता येते.
8/ 11
शेंगदाणे : जगातील जवळपास सर्वात पौष्टिक पदार्थ म्हणजे शेंगदाणे. यामध्ये व्हिटॅमिन B, अमिनो ऍसिड, पॉलीफिनॉल्स असतात. शेंगदाणे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. शेंगदाणे उकळून किंवा भाजून खातात येतात. त्याचप्रमाणे चटनी किंवा पदार्थांवर टाकूनही खाता येतात.
9/ 11
लोणी : लोणी किंवा व्हाईट बटर तुमच्या स्किन हायड्रेशन, बोन हेल्थसाठी खूप फायदेशीर असते. लोणी तुम्ही थालीपिठावर घालून किंवा नुसतेच खाऊ शकता.
10/ 11
कुळीथ डाळ : या डाळीमध्ये प्रोटीन, फायबर, मायक्रोन्यूट्रिनेट्स असतात. ही डाळ किडनी स्टोन, पोट फुगणे फायदेशीर असते.
11/ 11
हंगामी आजारांना दूर ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न खाणे आवश्यक आहे. म्हणूनच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलेल्या या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात नक्की करा.