एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी ट्रिपल-एक्स किंवा XXX लिहिलेलं पाहिलं की तो अधिक सावध आणि सतर्क होतो. लोक या तीन अक्षरांसाठी इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारे सर्च करतात आणि बरेच लोकांसाठी त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. सामान्य लोकांना विचारलं तर त्यांना याचा अर्थ फक्त प्रौढ चित्रपट एवढाच अर्थ ते घेतात, परंतु XXX चे अर्थ वेगवेगळे आहे. सोशल मीडियावर लोकांनी आपापल्या समजुतीनुसार या अक्षरांवर प्रतिक्रिया दिल्या. (प्रतिकात्मक छायाचित्र: कॅन्व्हा)
सोशल मीडिया वेबसाइट कोरा या व्यासपीठावर सामान्य लोक त्यांचे प्रश्न विचारतात, फक्त सामान्य लोकच त्यांची उत्तरे देतात. अशा परिस्थितीत या साइटवर दिलेली अनेक माहिती बरोबर असल्याचा दावा करता येणार नाही. काही काळापूर्वी या साइटवर हा प्रश्न विचारण्यात आला होता की XXX चा अर्थ काय आहे. यानंतर लोकांनी त्यांच्या समजुतीतून अनेक उत्तरे दिली आहेत. न्यूज18 लोकमत या माहितीच्या अचूकतेची पुष्टी करत नाही. (फोटो: Quora)
ट्रिपल एक्स सिंड्रोम हा एक प्रकारचा विकार आहे जो स्त्रियांमध्ये होतो, ज्यामध्ये काही स्त्रियांमध्ये भिन्न एक्स गुणसूत्र येतात. यामुळे महिलांमध्ये खूपच कमी किंवा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ज्यांना हा विकार आहे त्यांना काही गोष्टी लक्षात राहण्यास अडचण होते, शारीरिक विकासामध्ये उशीर होऊ शकतो. परंतु यासाठी उपचारांची आवश्यकता नसते. (प्रतिकात्मक छायाचित्र: कॅनव्हा)