रोज बाहेर पडताना बुट घालणे ही फक्त स्टाईल नाही तर गरज बनली आहे. प्रत्येक प्रसंगासाठी वेगळे बुट किंवा चप्पल आपल्याला लागतात. हे बुट ट्रेंडिंग आणि स्टायलिश असावे असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर याची खरेदी करताना बजेटचीही काळजी घ्यावी लागते. तुम्हाला ट्रेंडिंग आणि स्टायलिश बुट हवे असतील तर मुंबईतील एका खास जागेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मध्य मुंबईतील कुर्ला स्टेशनच्य समोर बुट आणि चप्पलचे होलसेल मार्केट आहे. या ठिकाणी तुम्ही स्वस्त दरात शूजची खरेदी करू शकता. या मार्केटमध्ये इतर रिटेल मार्केटपेक्षा 30 ते 40 टक्के कमी किंमतीमध्ये शूज मिळतात. कुर्ला भागात असणाऱ्या या मार्केटच्या नावानेच हा परिसर ओळखला जातो. मुंबईच्या सर्व भागातून ग्राहक इथं खरेदी करण्यासाठी येतात. या बाजारात 30 - 40 दुकानं आहेत. इथं तुम्हाला प्रत्येक ब्रँडचे बुट मिळतात. त्याचबरोबर लग्नासाठी लागणारे डिझायनर शुज, कोल्हापुरी, मोजडी देखील मिळते. मोठ्या दुकानांमध्ये महाग असणारे बुट इथं स्वस्तात मिळतात. साधारण 200 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत या मार्केटमधील बुटाचे दर आहेत. ऑनलाईन शॉपिंगच्या युगातही ज्यांना प्रत्यक्ष डोळ्यानं खात्री करून खरेदी करायची आहे असे मुंबईकर या मार्केटमध्ये खरेदी करतात. या मार्केटमध्ये तुम्हाला जगभरातील सर्व ब्रँड खिशाला परवडणाऱ्या रेटमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.