न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं 1 रुपयांचा दंड ठोठावला आणि हा दंड न भरल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होणार असा आदेश दिला. त्यानंतर दंडाची ही रक्कम ऐकून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. एक रुपयात काय होतं, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र एक रुपयाही खूप मोठा आहे. एक रुपयात किमान तुम्ही दहा वस्तू घेऊ शकता.
एक रुपयात आजही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मिळतात. यामध्ये एक्लेयर्स, मँगो बाइट, कॉफी बाइट आणि वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या च्युइंगमचाही समावेश आहे. लहान मुलांच्या बर्थ-डे पॅकेजमध्येही एक रुपयाच्या कँडीज मिळतात. एखाद्या दुकानात गेल्यानंतर दुकानदाराकडे सुटे पैसे नसतील तर ते एक रुपयाचं चॉकलेट देतात. हाजमोलादेखील एक रुपयात मिळतो. (फोटो सौजन्य - पिक्साबे)