

सध्या व्हॅलेंटाइन्स वीक सुरू आहे. प्रेमी आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी गिफ्ट आणणं सुरू असेल. त्या रोमँटिक दिवसाचं खास प्लॅनिंग पण सुरू असेल. पण स्त्रीची आपल्या जोडीदाराकडून काय अपेक्षा असते ते वाचा


महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ देणं. सगळेच हल्ली कमालीचे बिझी असतात. पण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वेळ दिला पाहिजे.


अनेकांना वाटतं आपल्या जवळच्या माणसाचं काय कौतुक करायचं? पण असा विचार चुकीचा आहे. प्रत्येकालाच कौतुक केलेलं आवडतं. तुम्ही तुमच्या जोडीदाराचं लूक, स्टाइल यांचं कौतुक करायला हवं. अगदी जोडीदाराच्या चांगल्या स्वभावाचंही. त्यानं नातं आणखी घट्ट होतं.


अनेकदा जोडीदार आधीच आपण रागीट आहोत, असं सांगतो. पुढे जाऊन मी आधीच कल्पना दिली होती, असंही म्हटलं जातं. पण सांगणं आणि अनुभवणं यात फरक आहे. पुन्हा जोडीदारावर राग काढणं हे काही भूषण नाही.


फ्रेंड्ससमोर तुम्ही तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा. तिच्या कामाबद्दल चांगलं बोला. आपल्या पार्टनरला सगळ्यांसमोर तुम्ही कसे स्वीकारता हे खूप महत्त्वाचं असतं.


तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्वयंपाकघरात मदत करा. मोठ्या भेटवस्तू देण्यापेक्षा छोट्या गोष्टीच मोलाचं काम करतात.