कोलेस्ट्रॉल जास्त असताना काय खावं? जर तुम्ही मांसाचे सेवन करत असाल तर, ते टाळणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचा मांसाहार अजिबात करू नका. कारण, यामुळे तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण जसजसं वाढेल, तसतसा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. तेव्हा, मांसाहार करणं घातक ठरेल.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका - कोलेस्टेरॉल वाढणं म्हणजे हृदयविकाराचा धोका वाढणं. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. यावर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे शरीर कोणत्याही रोगाच्या बाबतीत इशारा देत असतं.
जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉल वाढतं, तेव्हाही शरीर संकेत देतं. मात्र, अनेक वेळा छोट्या-मोठ्या समस्या उद्भवल्यानंतरही काही लोक या सर्व गोष्टी हलक्यात घेतात, त्यामुळे त्यांच्यासोबत अधिक गंभीर घटना घडण्याची शक्यता वाढते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)