एक्टोपिक प्रेग्नन्सीतही अशा वेदना होतात. या प्रेग्नन्सी गर्भाची वाढ गर्भाशयात न होता इतर भागात होऊ लागते आणि हे त्या महिलेसाठी जीवघेणं ठरू शकतं. पोटाच्या खालच्या भागावर अचानक आणि तीव्र वेदना होतात. याशिवाय खांदे आणि कमरेमध्येदेखील वेदना जाणवताच. तुम्हाला मळमळ, ब्रेस्ट जड वाटणं अशी प्रेग्नन्सीची लक्षणंही दिसतात.
पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज (Pelvic inflammatory disease - PID) हे बॅक्टेरिअल इनेफ्क्शन असल्यासची क्रॅम्प जाणवतात. सेक्समार्फत या इनफेक्शनचा धोका असतो. ओटीपोटाच्या दोन्ही बाजूला आणि कमरेच्या खालच्या बाजूला वेदना होतात. याशिवाय व्हजायना डिस्चार्ज, थोडासा रक्तस्राव, सेक्स करताना किंवा लघवी करताना वेदना आणि जळजळ. उलटी, मळमध अशी लक्षणंही दिसतात.
पेल्व्हिक फ्लोर मसल डिस्फंक्शन (Pelvic-floor muscle dysfunction) असल्यासही ही समस्या उद्भवते. मूत्राशय, गर्भाशय, व्हजायना आणि रेक्टम यांच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. सामान्य प्रसीतू किंवा एखाद्या अपघातात दुखापत झाल्यास ही समस्या उद्भवते. व्हजायनामध्ये जळडळ, शौचास समस्या, सेक्स करताना वेदना लघवी करताना जळजळ ही इतर लक्षणं आहे.