प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? हे स्टार्चयुक्त पदार्थ आत्ताच आहारातून काढून टाका
वजन कमी करण्यासाठी आपलं खाणंपिणं खूप महत्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला काही स्टार्ची पदार्थांबद्दल सांगणार आहेत, जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. वेगवेगळे डाएट फॉलो करतात, अनेक प्रकारचे व्यायाम करतात. मात्र तरीही कधी कधी वजन कमी होत नाही. याला तुम्ही खात असलेले काही पदार्थ कारणीभूत असतात.
2/ 6
ईएसआयसी हॉस्पिटल सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथील आहारतज्ज्ञ रितू पुरी यांनी हरजिंदगीला याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार आज आम्ही तुम्हाला काही स्टार्ची पदार्थांबद्दल सांगणार आहेत, जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील.
3/ 6
पांढरा ब्रेड : पांढऱ्या ब्रेडमध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नसते आणि त्यात स्टार्च जास्त असते. हे खूप लवकर पचते आणि त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागते. ज्यामुळे तुम्ही ओव्हरहाटिंग करू शकता. म्हणून वजन कमी करताना हे न खाणंच योग्य.
4/ 6
पांढरे तांदूळ : पांढरे तांदूळ लवकर पचतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा भूक लागू शकते. मात्र तुम्हाला भात खूप आवडत असेल तर तुम्ही पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राइस किंवा क्विनोआ खाऊ शकता.
5/ 6
इन्स्टंट नूडल्स : नूडल्समध्ये पोषकतत्त्वे खूपच कमी असतात. तर फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात. जे लोक आठवड्यातून दोनदा इन्स्टंट नूडल्स खातात त्यांना मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.
6/ 6
पोटॅटो चिप्स : बटाटा चिप्स उच्च स्टार्चयुक्त पदार्थ आहे, त्यामध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाणही जास्त असते. यामध्ये ट्रान्स फॅट देखील आढळते, ज्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेह इत्यादींचा धोका वाढू शकतो.