

महिला ब्रेस्टला सपोर्ट देण्यासाठी ब्रा घालतात. मात्र काही महिलांना रात्रीही ब्रा घालून झोपायची सवय असते. रात्री ब्रा घालून झोपल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात. याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विशाल माकवाना यांनी माय उपचारवर माहिती दिली आहे.


झोपताना ब्रा घातल्याने सर्वात मोठा होणारा दुष्परिणाम म्हणजे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. ब्रामुळे ब्रेस्टचे स्नायू दाबले जातात आणि ब्रेस्ट, अंडरआर्म्स या भागात होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो.


ब्रा घालून झोपल्याने त्याचे हुक आणि स्ट्रिप्समुळे त्वचेला हानी पोहोचून शकते. नेहमी ब्रा घालून झोपायची सवय असल्यास त्वचेवर एखादी जखम होऊ शकते, फोड येऊ शकतो.


झोपताना ब्रा घातल्याने ब्रेस्टला मोकळी हवा मिळणार नाही परिणाम फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. सुरुवातीला रॅशेस येतील आणि हळूहळू ही समस्या वाढत जाईल.


हायपरपिगमेंटेशन ही त्वचेची समस्या उद्भवू शकते. त्वचेमध्ये मेलानिन हे पिगमेंट असतं, ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. रात्री झोपताना ब्रा घातल्यामुळे या पिगमेंटवर परिणाम होतो आणि हायपरपिगमेंटेशन म्हणजे त्वचेचा रंग बदलेल, शरीरावरील त्वचेचा रंग एकसारखा दिसणार नाही. काही ठिकाणी तो गडद असेल तर काही ठिकाणी फिकट.