लतादीदींचं गाणं गाणाऱ्या रस्त्यावरच्या गायिकेचा थक्क करणारा मेकओव्हर; आयुष्य एका Viral VIDEO ने बदललं
रस्त्यावरची एक महिला लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' गात होती. लोक तिला पैसे देत होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पुढे काय झालं पाहा....


काही दिवसांपूर्वी लता मंगेशकरांचं एक गाणं अगदी हुबेहूब तसंच गाणाऱ्या या रस्त्यावरच्या गायिकेचा व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल. ओळखताही येणार नाही एवढा बदल तिच्यात झालाय. निमित्त ठरला तो व्हायरल व्हिडिओ


लता मंगेशकरांचं अवघड गाणंही ती अगदी सहजतेने गात होती. तिचं आवाज ऐकून आश्चर्यचकित झालेल्या एकाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. 20 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आणि रस्त्यावरची ही गायिका अचानक प्रसिद्ध झाली.


हा व्हिडिओ ऐकून एका इव्हेंट कंपनीने तिला गाठलं आणि मुंबईत एका गाण्याच्या कार्यक्रमात गाण्यासाठी तिला तयार केलं. तिचा मेकओव्हरही त्यांनी केलाय. ही कंपनीच तिला स्पॉन्सर करणार आहे.


या रस्त्यावरच्या बाईचं नाव राणू असं आहे. ती बंगाली आहे. मुंबईत बबलू मंडल नावाच्या इसमाशी राणूचं लग्न झालं.


पतीच्या निधनानंतर ती बंगालमध्ये परतली आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाणी गाऊन तिने गुजराण करायला लागली.