

लोक आपलं वजन (Weight) कमी करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करतात. यामध्ये ते विविध डाएटही (Diet) फॉलो करतात. या डाएटमध्ये खाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींचा आहारामध्ये समावेश केला जातो. यामध्ये ज्यूस, फळं आणि अशा स्वरुपाच्या हलक्या पदार्थांचं सेवन केलं जातं. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की बारीक होण्यासाठी अवलंब केलेल्या पर्यायांमुळे शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं, इज्राईलच्या एका महिलेने जाडी कमी करण्यासाठी लिक्विड डाएट फॉलो केलं होतं. मात्र यामुळे तिला मोठा फटका बसला आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (फोटो सौ. AFP)


इज्राईलच्या एका 40 वर्षीय महिलेने फिट राहण्यासाठी एका थेरेपीअंतर्गत लिक्विड डाएटची मदत घेतली. आणि यामुळे तिच्या मेंदूवर खूप परिणाम झाला. महिलेचं ब्रेड डॅमेज झालं. आणि ती रुग्णालयात भरती आहे. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेने तीन आठवड्यात केवळ स्ट्रिक्ट ज्यूट डाएट फॉलो केला आणि याकारणामी ही परिस्थिती उद्भवली. (फोटो सौ. न्यूज18 बंगाली)


डाइट सुरू करण्यापूर्वी महिलेने अल्टरनेट थेरेपीची सुरुवात केली होती आणि या थेरेपीदरम्यान महिलेला केवळ ज्यूस आणि पाणी पिण्यास सांगिले होते. यानंतर महिलेच्या शरीरातील मीठाचं संतुलन बिघडू लागलं. यामध्ये तिचं वजन 40 किलोने कमी झालं होतं. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)


तपासानंतर डॉक्टरांनी सांगितले की, महिला हायपोनाट्रेमिया नावाच्या आजाराने ग्रस्त होती. आणि ही समस्या मेडिकल सायन्समध्ये वॉटर इंटॉक्सिनेशन नावाने ओळखली जाते. ही समस्या तेव्हा झाली जेव्हा ब्लड सेल्समधून सोडियमचं प्रमाण कमी होतं. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. आता डॉक्टरांना भीती आहे की, कुपोषण आणि लिक्विड डाएटमुळे महिलेच्या मेंदूमध्ये कायमचा बिघाड होऊ शकतो. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)