अनेक फुले फूलती, फुलोनिया सुकोन जाती. कोणी त्यांची महती, गणती ठेवली असे. मात्र अमर होय ती वंशलता, निर्वश जिचा देशाकरिता. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमिचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज, भारी आईची झोपडी प्यारी. हे मातृभूमी, तुजसाठी मरण तें जनन, तुजविण जनन ते मरण आपल्या प्रामाणिकपणाचा उपयोग होईल पण केव्हा? तर दुसऱ्यास प्रामाणिकपणा बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच. उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतंही बलिदान वाया जात नाही.