जगातल्या या सुंदर शहराची झाली 'तुंबई'; पाण्यात बुडतंय युरोपातलं हे कालव्यांचं शहर
Global Warming चे परिणाम जगभरात दिसत असतानाच इटलीमधलं Venice हे शहर पाण्यात गेलं आहे. सतत पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने कालव्यांचं हे सुंदर शहर पाण्यात कसं बुडत आहे पाहा..


ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जगावर होत असतानाच इटलीमधलं व्हेनिस हे शहर पाण्यात गेलं आहे. सतत पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने व्हेनिसच्या सुंदर इमारती पाण्यात गेल्या आहेत.


जगातलं एक सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे इटालियन लेक टाऊनवर पाण्यामुळेच संकट ओढावलं आहे. हा ग्लोबल वार्मिंगचा मोठा परिणाम आहे ज्यामुळे हे शहर पाण्याखाली जात आहे.


या घटनेची वैज्ञानिकांनीही पाहणी केली. तापमानात होणारे बदल हे या घटनेचं कारण आहे. इटलीच्या या शहराबाबत पाणी वाढणआर हे वैज्ञानिकांनी आधीच सूचित केलं होते. त्यांच्या मते, दरवर्षी हे शहर 0.8 ते 1 मिलीमीटर अधिक पाण्यात जाणार आहे.


इंडिपिडेंट या वर्तमानपत्रात ग्लोबल वॉर्मिंगविषयी प्रसिद्ध केलेल्या 2017 च्या एका रिपोर्टनुसार, युरोपमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणांना लवकर नियंत्रित केलं नाही तर, व्हेनिस शहर पूर्णपणे उद्धवस्त होईल. पण, ज्यापद्धतीने शहरात पाण्याच्या पातळीत वाढ होतेय ते थांबवणं अशक्य आहे.


या रिपोर्टच्या माहितीनुसार भूमध्य समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. ही वाढ 140 सेमीपर्यंत पोहोचली आहे. ग्रीनहाउस गॅसमुळे त्याच्या पातळीत वाढ होत आहे. इटलीचा पश्चिमेकडे असलेला 176 मीटर लांब समुद्रकिनारा भविष्यात नष्ट होण्याचा धोका दर्शवला आहे.


व्हेनिसमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी भरतीच्या वेळी पूर येतो. सॅटेलाईटच्या माध्यमातून याची पूर्वसूचना मिळू शकते. पण व्हेनिसमध्ये दरवर्षी पूर येत आहे त्यामुळे शहर पाण्याखाली जातं.