

वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाक घरात कधीही दूध उघडं ठेवू नका. यामुळे आर्थिक संकट येतं. दूध नेहमी बंद ठेवावं. तसेच बोनसाय आणि काटेरी रोपं कधीही घरात ठेवू नका, यामुळे घराचं वास्तू बिघडतं आणि नकारात्मक उर्जा घरात येते.


घरात रामायण आणि महाभारताशी निगडीत फोटो लावू नये. घराच्या उत्तर- पूर्व भागात मोठ्या मूर्तीही ठेवू नये. तसेच बेडरूममध्ये बेडच्या खाली चपला ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते.


लोखंडाचं कपाट कधीही बेडच्या मागे ठेवू नये. तसेच लोखंडाच्या कोणत्याही गोष्टी बेडच्या खाली ठेवू नये. घराच्या मधोमध पाण्याची टाकी, हँडपंप, पाण्याचा घडा ठेवू नये, यामुळे आर्थिक नुकसान होतं.


धन संपत्ती तसेच कौटुंबिक सुख- शांतीसाठी बुडणाऱ्या जहाजाचा फोटो घरात लावू नये. तसेच दान आणि पूजेसाठी आणलेल्या गोष्टी फार काळ घरात ठेवू नयेत. देवी- देवतांच्या तुटलेल्या मुर्तीही घरात ठेवू नयेत.