खोल्यांमध्ये नैसर्गिक प्रकाश पडावा वास्तुशास्त्रानुसार, घर बांधताना लक्षात ठेवा की नैसर्गिक प्रकाश (सूर्यप्रकाश) प्रत्येक खोलीत किंवा किमान प्रत्येक बेडरूममध्ये पोहोचला पाहिजे. या प्रकाशासह घरात आणि आपल्या जीवनात सकारात्मकता नांदते. घरात भांडण किंवा विसंवादाची परिस्थिती निर्माण होत नाही. (छायाचित्र - शटरस्टॉक)
भिंतीला चीर पडलेली असू नये- वास्तुशास्त्रानुसार, जर उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीमध्ये भेग दिसत असेल तर ती त्वरित दुरुस्त करा. असे मानले जाते की या भेगा अशुभ असू शकतात, एवढेच नाही तर चीर पडलेल्या भिंतींमुळे कौटुंबिक कलह आणि भांडणे देखील होऊ शकतात. जर घरात कलह वाढला तर तुळशीचे रोप घराच्या उत्तर दिशेला लावावे. (फोटो - शटरस्टॉक)
सुकलेली फुले घरात ठेवू नका- वास्तूशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात फुले ठेवावीत, पण विशेषतः काळजी घ्या की वाळलेली फुले घरात अजिबात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. (प्रतीकात्मक फोटो- शटरस्टॉक) (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)