दुसऱ्यांच्या या 6 गोष्टी कधी चुकूनही वापरू नका, वास्तुशास्त्रानुसार विचित्र त्रास वाढू लागतात
Vastu Tips : अनेकदा तुम्ही वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल की, इतरांच्या वस्तू कधीही त्यांच्याकडून मागून वापरू नयेत. वास्तुशास्त्रातही असं करण्यास मनाई केली आहे. वास्तू नियमांनुसार, इतरांकडून मागवून घेतलेल्या काही गोष्टींचा वापर करून नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये राहते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार, कोणकोणत्या वस्तू इतरांकडे मागवून वापरू नयेत-
|
1/ 5
रुमाल- वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचा रुमाल जवळ ठेवल्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्याचा संबंध वादाशीही होताना दिसतो. म्हणूनच दुसऱ्याचा रुमाल कधीही वापरू नये.
2/ 5
घड्याळ - वास्तुशास्त्रात घड्याळाला सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्हींशी जोडलेले मानले जाते. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो, असे म्हणतात.
3/ 5
अंगठी- एखाद्याची अंगठी मागवून घेऊन स्वत: वापरणे, वास्तूशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर, आयुष्यावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.
4/ 5
पेन- वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे पेन वापरू नयेत. असे केल्याने करिअरवर वाईट परिणाम होतो, असे म्हणतात. यामुळे धनहानी देखील होऊ शकते.
5/ 5
कपडे- वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. असे केल्याने आपल्यात नकारात्मकता येते आणि जीवनात अडचणी येतात असे म्हणतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)