

व्हॅलेंटाइन्स डेचे वारे वाहायला लागलेत. प्रत्येकाच्याच मनात एखादी स्पेशल व्यक्ती असते. तिच्यावरचं प्रेम कसं व्यक्त करायचं हा प्रश्न असतो. व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी प्रपोझ डे असतो. ती संधी तुम्ही सोडू नका.


Propose Dayला तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीला घेऊन प्रवासाला जाऊ शकता. प्रवासात माणसं एकमेकांच्या जास्त जवळ येतात. त्याच वेळी एखाद्या रोमँटिक ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोझ करू शकता.


तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्यासोबत एखादा रोमँटिक सिनेमा प्लॅन करू शकता. सिनेमा पाहतानाच तुम्ही प्रपोझ करू शकता.


तुम्ही तुमच्या आॅफिसमधल्या सहकाऱ्याच्या प्रेमात पडलात किंवा कोचिंग क्लासमध्ये तुमच्यासोबत शिकणाऱ्या मुलीच्या तर तुमच्या मनातलम प्रेम हळू हळू तिच्यापर्यंत पोचवा.


सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे. फेसबुक किंवा व्हाॅट्सअॅपच्या मदतीनं रोमँटिक व्हिडिओ पाठवून तुम्ही प्रपोझ करू शकता.


तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला घेऊन लाँग ड्राइव्हला जाऊ शकता. रात्रीची वेळ, मोकळा रस्ता, आकाशात लुकलुकणारे तारे, हलकसं संगीत... इतक्या रोमँटिक वातावरणात तुम्ही प्रपोझ केलं तर ती नाही म्हणणं शक्य नाही.