विरसवियाला पेंटालॉजी ऑफ कान्ट्रेल आहे. यामुळे ती गर्भात असतानाच तिच्या पोटातील स्नायू आणि हाडांची रचना चुकीच्या पद्धतीनं झाली. ज्यामुळे तिचं हृदय शरीराच्या बाहेरच्या दिशेनं आलं. तिच्या हृदयात छेदही आहे. ज्यामुळे तिला नेहमी रुग्णालयात दाखल करावं लागतं. (फोटो सौजन्य - Instagram virsaviya borun goncharova)
असं असलं तरी तिला कोणत्याही वेदना होत नाही. अगदी इतर मुलींप्रमाणेच ती सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न ती करते. खेळणं, गाणं, नाचणं सर्वकाही ती करते. यामुळे तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि तिला चक्कर येते. पण ती यामुळे खचलेली नाही. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद ती लुटते. (फोटो सौजन्य - Instagram virsaviya borun goncharova)