

अनेकदा आपण कामात बिझी असतो. अशा वेळी अचानक डोकेदुखी सुरू होते. डोकं थांबण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण बऱ्याचदा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ही डोकेदुखी होत असते.


व्हिटॅमिन डीची कमतरता - आपल्याला अन्न, सप्लिमेंट आणि सूर्याचा प्रकाश इथून व्हिटॅमिन डी मिळतं. त्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते. डाॅक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे व्हिटॅमिन डीचा ओव्हरडोसही चांगला नसतो.


नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थनुसार 19 ते 70 वर्षांपर्यंत 600 IU (इंटरनॅशनल युनिट्स) व्हिटॅमिन डी लागतं. मासे, दुग्धजन्य पदार्थ, संत्र्याचा ज्युस, काळे चणे जास्त खावेत.


मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होते. व्हिटॅमिन डीमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. पेशींचं काम नियंत्रणात ठेवायला मदत करतं.


मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मायग्रेन होऊ शकतं. दूध, दही, हिरव्या पालेभाज्या यांच्यापासून व्हिटॅमिन डी मिळतं.


शरीरीतल्या पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते. शरीरात पाणी पुरेसं असणं गरजेचं. सऱीरातली दूषित द्रव्य पाणी बाहेर फेकतं. रोज दोन ते अडीच लीटर पाणी प्यायला हवं.


व्हिटॅमिन B2ची कमतरता असता कामा नये. त्यामुळे पचन चांगलं होतं. शरीराला पोषक द्रव्य मिळालायला मदत करतं. हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये हे भरपूर असतं.