

व्हॅलेंटाइन्स डे जवळ येत चाललाय. कपल्सचे वेगवेगळे प्लॅन्स सुरू आहेत. पण सिंगल असलेल्यांनी काय करायचं, हा मोठा प्रश्न असतो. पण जे सिंगल आहेत तेही व्हॅलेंटाइन्स डे अनोख्या पद्धतीनं साजरा करू शकतात. वाचा या टिप्स


आपल्यासारखे अनेक सिंगल मित्रमैत्रिणी असतात. व्हॅलेंटाइन्स डेला सगळे जमून घरी पार्टी करू शकता. शिवाय एकमेकांना छानसं गिफ्टही देऊ शकता. असतात.


तुम्ही एकटे आहात आणि उदास आहात तर शाॅपिंगसारखं औषध नाही. या दिवशी तुमच्या आवडत्या गोष्टींचं शाॅपिंग तुम्ही करू शकता.


या दिवशी आपल्यावर प्रेम करणारं कोणी नसलं तर आपण स्वत:वरच प्रेम करावं. यासाठी तुम्ही एखाद्या स्पामध्ये जाऊन मसाज करून घेऊ शकता. त्यानं मन प्रसन्न राहील.


यादिवशी तुम्हाला न्यू लूक हवं असेल तर ब्युटिपार्लरला जाणं हा चांगला पर्याय आहे. आपलंच लूक बदललं तर छान वाटेल.


वाचनाची आवड असेल तर चांगलं पुस्तक या दिवशी वाचा. तुम्ही एखादं मोटिव्हेशनल पुस्तकही वाचू शकता. पुस्तकासारखा मित्र नाही.


व्हॅलेंटाइन्स डेला तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करू शकता. निसर्गाच्या सान्निध्यात मनाचं एकटेपणही दूर होतं.