

हॉकीचे जादुगार अशी ओळख असलेल्या ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 अलाहाबाद येथे झाला. भारतीय खेळासाठीचं अनन्य साधारण योगदान पाहून आपल्याकडे त्यांच्या जन्म दिन हा 'राष्ट्रीय क्रीडादिन' म्हणून साजरा केला जातो.


वयाच्या 16 व्या वर्षी ते भारतीय सैन्यात भरती झाले. तेव्हापासूनच ते हॉकी खेळात रममाण झाले. त्यांना रात्रीचा सराव करायला आवडायचा म्हणून ‘चांद’ हे त्यांना टोपणनाव पडलं. 1956 मध्ये त्यांना मेजर ही पदवी देण्यात आली.


1928 मध्ये अमस्टडॅम ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांनी सर्वाधिक 14 गोल केले होते. एवढंच नाही तर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1928, 1932 आणि 1936 असे तीन ऑलिम्पिक सूवर्ण पदक मिळवले.


अडॉल्फ हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीचं नागरिकत्त्व देऊ केलं होतं. एवढंच नाही तर 1936 बर्लिन ऑलिम्पिकमधील त्यांचा खेळ पाहून हिटलरने त्यांना जर्मनीच्या सैन्यातही पद देऊ केलं होतं.


2002 मध्ये दिल्ली येथील नॅशनल हॉकी स्टेडिअमचं नाव बदलून ध्यान चंद नॅशनल स्टेडिअम असं करण्यात आलं.