

व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी वेगवेगळे वीक्स असतात. चाॅकलेट डेचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात गोडानं होते. चाॅकलेट डेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपुढे मन उघड करू शकता.


चाॅकलेट डे रोमँटिक करण्यासाठी तुम्ही घरात कानाकोपऱ्यांत चाॅकलेट लपवू शकता. त्याच्या बरोबर Love Note ठेवू शकता.


तुम्ही तुमच्या जोडीदाराला बेड टी देत असाल तर त्याबरोबर चाॅकलेट ठेवलंत तर दिवसाची सुरुवात एकदम रोमँटिक होईल.


तुम्ही चाॅकलेट डेला तुमचं शरीर चाॅकलेटनं पेंट करून जोडीदाराला सरप्राइझ देऊ शकता. त्यानं नात्यात एक स्पार्क येऊ शकतो.


गुलाबाच्या सोबत एक चाॅकलेट गिफ्ट दिलं तर तुमचा जोडीदार नक्कीच आनंदित होईल. व्हॅलेंटाइन्स डे आधीच वातावरण रोमँटिक होऊन जाईल.


स्पर्शाची जादू काही अनोखीच असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला चाॅकलेट स्पा देऊ शकता. त्यानं तुमचं नातं जास्त रोमँटिक होईल.