

लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्याचं पुढचं प्लॅनिंग असतं ते हनीमूनचं. आपलं हनीमून हे चांगल्या ठिकाणी व्हावं अशी सर्वांची इच्छा असते. जर तुम्ही विदेशात हनीमूनचं प्लॅनिंग करत असला तर काही अशी ठिकाणं आहे, जी तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात.


स्वस्त आणि सुंदर देशाच्या यादीत पहिले नाव येते ते थायलंडचे. हनीमूनसाठी इथं अनेक ठिकाणी तुम्हाला चांगले हाॅटेल आणि फिरण्यासाठी पर्यटनस्थळं आहे. यामध्ये माऊंटेन रिट्रीट्स, समुद्रकिनारे, शानदार सिटी लाईफ आणि एनिमल सेंचुरी सारख्या जागी तुम्हाला फेरफटका मारता येईल.


मालदीव - इथं जगातील सर्वात सुंदर समुद्रकिनारे आहेत. या बेटावर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये हनीमून प्लॅन करू शकतात. मालदीव ही जागा दाम्पत्यांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे.


सांडोरिनी आणि अथेंस - जर तुम्हाला एखाद्या बेटावर निवांत क्षण हवे असतील तर सांडोरिनी आणि अथेंस हे त्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. सांडोरिनी आणि अथेंसमध्ये आॅक्टोबर ते मे महिन्यादरम्यान हनीमूनसाठी नवदाम्पत्यांची गर्दी असते.